नमस्कार.
प्रचिती वधू वर सूचक मंडळाच्या वेब साईट वर मी तुमचे स्वागत करते. माझे नाव सौ. चित्रा चंद्रशेखर केसकर. प्रचिती वधू वर सूचक मंडळाची मी संचालिका आहे. गेली २७ वर्षे मी हे मंडळ चालवत आहे..
ब्राह्मण समाजातील लोकांची लग्न आपल्याकडून जमावी या छोट्या इच्छेने मी हे मंडळ चालू केले. माझे हे छोटे रोपटे कधी मोठा बहरलेला वृक्षात बदलले हे कळले देखील नाही. म्हणता म्हणता २७ वर्ष हे कार्य चालू राहिले. आता या वेबसाईटच्या रूपाने आम्ही पुन्हा तुम्हाला सेवा देण्यात सज्ज आहोत. आजवर जो उदंड प्रतिसाद, प्रेम आणि विश्वास तुम्ही सर्वांनी दिलात तो असाच उत्तरोत्तर वाढत जावो हीच विनंती